सफन्या 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत; ते विश्वासघातकी लोक आहेत. तिचे याजक मंदिर अपवित्र करतात ते आज्ञेचे उल्लंघन करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे! Faic an caibideil |
जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
“पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’
त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.