Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:3
15 Iomraidhean Croise  

असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्‍या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो.


तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.


त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.


“परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”


“याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत; माझ्या मंदिरातही मी त्यांची तिरस्करणीय कृत्ये पाहिली आहेत,” असे याहवेह म्हणतात.


यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले,


म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.


“ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत.


तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’


त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;


Lean sinn:

Sanasan


Sanasan