Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत राहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे; कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:7
39 Iomraidhean Croise  

“सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही? जे त्यांना ओळखतात त्यांनी त्या दिवसांची व्यर्थ वाट का पाहावी?


ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”


ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे. जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत— मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे.


आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.


गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—


तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन; ती शोक करेल आणि विलाप करेल, ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल.


माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.


याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.


“मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”


कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.


“ ‘पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! विनाशाचा भडका उठला आहे, काठीला अंकुर फुटला आहे, अहंकार फुलला आहे!


तुम्ही जे देशात राहतात, त्या तुमच्यावर विनाश आला आहे. समय आला आहे! दिवस जवळ आहे! डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.


त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.


याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?


याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”


सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”


परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.


याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.


याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल.


हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.”


सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही.


“तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’


आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.


मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”


तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत.


त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे.


शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले.


शौल त्या दिवशी काही बोलले नाही, कारण त्यांना वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan