Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:5
30 Iomraidhean Croise  

मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.


शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला.


एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही.


त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले.


ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत.


हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत.


यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.


दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?


काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’; तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील; आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील.


मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.


“याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—


आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.


यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”


हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.


आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”


अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?


‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”


“मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.


आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय?


“ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,


आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.


त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे, आणि आता त्यांना त्यांचे अपराध भोगावेच लागतील. याहवेह त्यांच्या वेद्या पाडून टाकतील आणि त्यांच्या पवित्र दगडांचे तुकडे करतील.


“हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.


तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा, तुमच्या काइवान मूर्तीची बैठक, तुमच्या दैवताचा तारा उंचाविला; जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.


“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.


दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला.


कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”


याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.


जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.


तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये


Lean sinn:

Sanasan


Sanasan