Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा मी यहूदीयातील आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्‍यांच्या नावाचा—

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 “मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन; ह्या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक ह्यांचे नावही नाहीसे करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:4
14 Iomraidhean Croise  

मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन.


यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.


त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे त्याने बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले.


तुम्ही आपला उजवा हात उगारला, आणि पृथ्वीने तुमच्या शत्रूंना गिळून टाकले.


तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.


त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील, ते त्यांची शेते व त्यांच्या स्त्रियाही इतरांना दिल्या जातील, जेव्हा माझा हात मी या देशात राहणाऱ्या लोकांविरुद्ध उगारेन, तेव्हा हे घडेल,” असे याहवेह जाहीर करतात.


आता मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन व तुला राष्ट्रांना लूट म्हणून देईन. राष्ट्रांतून मी तुला पुसून टाकेन आणि देशातून तुला नाहीसे करेन. मी तुझा नाश करेन आणि तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”


मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”


शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.


मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.


जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.


ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan