Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन आणि जे बेफिकीर असतात, जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:12
19 Iomraidhean Croise  

हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’


दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही.


मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.


ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”


धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”


ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”


“अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”


आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”


याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’


तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो!


परंतु एसावला लुटण्यात येईल, आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल!


तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”


ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”


मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan