Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, तुमचे सर्व व्यापारी, सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “मक्तेशच्या2 रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मक्तेशातल्या रहिवाश्यांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:11
16 Iomraidhean Croise  

दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,


जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.


अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्‍यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.


म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा, शोक व आक्रोश करा. कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध अजून आमच्यावरून शमलेला नाही.


हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.


जरी ते नाशापासून सुटले तरी इजिप्त त्यांना गोळा करेल, आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.


अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्‍यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.


हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”


यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी नसतील.


मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका”


श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan