Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवाज होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:10
18 Iomraidhean Croise  

तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.


दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.


याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.


मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.


अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.


नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.


हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.


नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.


मासे फाटक हस्सनाहच्या पुत्रांनी बांधली. त्यांनी तुळया बसविणे, दरवाजे, कड्या व अडसर लावणे आणि गज बसविणे इत्यादी कामे केली.


आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो; कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो. आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही; सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते.


आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली.


एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”


त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.


सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”


तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल— तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा, तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा, तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा, तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—


सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan