Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्‍याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा आमोन ह्याचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दित सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमर्‍या बिन हिज्कीया ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:1
12 Iomraidhean Croise  

मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.


उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला.


मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.


यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले,


यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.


गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत.


बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.


यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:


संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.


आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan