जखर्या 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.” Faic an caibideil |
हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत.
यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.