Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्‍या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन. तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:4
19 Iomraidhean Croise  

अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.


निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे, अग्नी त्याला भस्म करेल आणि त्याच्या तंबूमध्ये जे काही उरलेले आहे ते गिळून टाकेल.


ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत.


तुझे शत्रू लज्जा पांघरतील, आणि दुष्टांचे निवासस्थान अस्तित्वात राहणार नाही.”


याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात.


म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, आणि फारच थोडे उरले आहेत.


“चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.


या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.


म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.


“जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”


मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्‍या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.


एकमेकांविरुद्ध दुष्ट कारस्थान करू नका आणि खोटी शपथ घेण्याची आवड धरू नका. मला या सर्वाचा अतिशय तिरस्कार वाटतो,” असे याहवेह जाहीर करतात.


“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.


नाशाचे कारण असलेली कोणतीही किळसवाणी वस्तू घरात आणू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल. ती घृणास्पद समजून तिचा अगदी वीट माना, कारण ती शापित आहे.


आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan