Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “जरुब्बाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 4:9
18 Iomraidhean Croise  

“म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.”


“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” आणि आता सार्वभौम याहवेहने, त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे.


‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा:


“म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.


“त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.


हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.”


याहवेहकडून मला एक वचन मिळाले:


दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.”


आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारेन; तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचा विजय होणार नाही.


हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल.


परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे.


आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan