Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 4:2
19 Iomraidhean Croise  

दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली.


रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे.


दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या.


आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,


तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”


रक्षक दलाच्या अधिकार्‍याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते.


आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा!” नंतर प्रभू म्हणाले, “पाहा मी माझे लोक इस्राएल यांच्यामध्ये ओळंबा धरणार आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.


त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.”


माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले.


तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”


राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan