Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 2:12
19 Iomraidhean Croise  

परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’


मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!”


“माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”


कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात,


“हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे; मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे.


कारण याकोबाला आपलेसे करावे, इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले.


ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.


हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.


याहवेह याकोबवर दया करतील; पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील. परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील.


संध्याकाळी अचानक दहशत! सकाळ होण्याआधीच ते गेले असतात! जे आम्हाला लुटतात त्यांच्या वाट्याला हे येते, जे आमची लूटमार करतात त्यांचा हा वाटा आहे.


पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे, तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे. मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’; मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही.


परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.


“ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.


परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.


“आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”


तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?”


एका मरुभूमीत त्यांना ते भेटले ते घोर व भयाण अरण्य होते. त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले; त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,


कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan