Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यहूदातून कोनशिला येईल, त्याच्यातूनच तंबूचा खिळा, त्याच्यातूनच युद्धाचे धनुष्य, त्याच्यातूनच प्रत्येक अधिकारी येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 10:4
29 Iomraidhean Croise  

परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.


“पण आता या थोड्या काळासाठी याहवेह आमच्या परमेश्वराने आमच्यावर कृपा करून आमच्यापैकी काही थोड्या लोकांना जिवंत राखले आणि त्यांच्या या पवित्रस्थानी आम्हाला स्थिर केले आहे. आमच्या परमेश्वराने आमच्या दृष्टीस प्रकाश दिला व आम्हाला गुलामगिरीतून थोडी विश्रांती दिली आहे.


जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे;


सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.


म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही.


त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे.


“पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला मीच उत्पन्न केले आहे. व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे;


आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच.


“तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,


मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.


परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन. यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत, आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन.


“मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.


हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.”


येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग, “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मशास्त्रात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?


तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.


कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे.


कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”


ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”


तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan