जखर्या 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मूर्ती लबाड बोलतात, दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात; ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात, त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते. म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत. Faic an caibideil |
जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.