Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:5
16 Iomraidhean Croise  

आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!”


अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली. मोआबातील लुटारूंच्या टोळ्या प्रत्येक वसंतॠतूत देशावर हल्ला करीत असत.


आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे; आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे; परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.


पिढ्या येतात आणि पिढ्या जातात, परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते.


जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.


आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी, आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.


“दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.


आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.


यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.


“दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले.


जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे,


शमुवेल मरण पावले तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्यांच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्यांना रामाह येथील त्यांच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan