Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:16
24 Iomraidhean Croise  

तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले?


त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.


ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.


“परंतु याहवेह असे म्हणतात: “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल.


याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.


तो मनुष्य आपल्या हातात मापनदोरी घेऊन पूर्वेच्या दिशेने गेला, त्याने एक हजार हात मापले आणि घोट्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले.


“चोहीकडील अंतर अठरा हजार हात असणार. “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’ असे असणार.”


याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.


“मी यहूदाहला बलवान करेन आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. मी त्यांची पुनर्स्थापना करेन कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. ते असे होतील, जणू काही मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे आणि मी त्यांचा धावा ऐकेन.


व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील.


आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.


“चला! चला! उत्तरेकडील देशांमधून बाहेर पळा, कारण मी तुम्हाला स्वर्गातील वाऱ्याच्या चारही दिशांना विखुरले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.


“जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.


याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan