Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी सत्कार्य करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यांसाठी हितकारक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 3:8
26 Iomraidhean Croise  

कारण गरजवंतांना मदत करण्यास आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही.


त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.


त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.


आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे,


त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.


ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे.


जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्‍या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो.


नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात;


“मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे.


“मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?


तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.


कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही; ते आपली सुटका करतील असा भरवसा ठेवला नाही.


खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल.


असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,” त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो.


ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत असावा.”


चोरी करणार्‍यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.


म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.


जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.


याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.


जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव.


आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या.


त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan