Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; सर्वप्रकारे बहकलेले आणि विलासवृत्ती आणि दुष्ट वासनांचे गुलाम होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एकमेकांचा द्वेष करणारे होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 3:3
37 Iomraidhean Croise  

ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.


तिने तिचा धनी घरी येईपर्यंत तो झगा आपल्याजवळच ठेवला.


ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की, त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत.


तुम्ही जे साधे भोळे आहात, समंजसपणा मिळवा; तुम्ही जे मूर्ख आहात, तुमचे लक्ष तिच्याकडे लावा.


तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.”


असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”


तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’


मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला.


येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका.


त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे.


एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे,


तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका.


परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.


पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.


आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.


कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.


आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो.


एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता.


पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता.


परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.


ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.


ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.


ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे;


जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवितात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे.


आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका.


तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.


कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.


तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan