9 त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.
9 आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करण्यास व उलट बोलणार्यांना कुंठित करण्यासही समर्थ व्हावे.
9 आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे.
9 आणि दिलेल्या शिक्षणानुसार विश्वसनीय वचनाला धरून राहणारा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व विरोधकांना निरुत्तर करावयासही समर्थ व्हावे.
तेव्हा याहवेहने त्याला विचारले, “मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे.”
कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.
परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील.
कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील.
प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.
जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.