Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, सुज्ञ, नीतिमान, भक्तिमान, शिस्तप्रिय

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:8
17 Iomraidhean Croise  

त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.


शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”


पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”


दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा; न्यायालयात न्याय स्थापित करा. मग कदाचित याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर योसेफाच्या उरलेल्या लोकांवर दया करतील.


यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.


तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.”


तुमच्यातील प्रत्येकाशी आमचे वागणे पवित्र, नीतीने व निर्दोष होते, याला तुम्ही विश्वासणारे स्वतः आणि परमेश्वर साक्षी आहेत.


तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.


कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.


परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.


तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग.


ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे,


जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव.


आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात.


येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात.


दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan