Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यांच्यावर दुराचाराचा व ती अवज्ञा करणारी असल्याचा आरोप नसावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ज्याला नेमावयाचा तो निर्दोष असावा; तो एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्‍वास ठेवणारी असावीत व त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसावा, ती बंडखोर नसावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:6
18 Iomraidhean Croise  

कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”


सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.


त्यांनी विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी विवाह करू नये; केवळ इस्राएली गोत्रातील कुमारिकांशी किंवा याजकाच्या विधवेशी विवाह करावा.


त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,


“ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत.


तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.


यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्‍याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.


मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबुड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा.


नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे


सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.


कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत.


नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला.


आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएल लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan