Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला: परमेश्वर पिता आणि आपले तारणकर्ता ख्रिस्त येशू यांच्याकडून कृपा व शांती असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आपल्या सामाईक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे. देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:4
31 Iomraidhean Croise  

आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.


मग ते त्या बाईला म्हणाले, “तू सांगितले म्हणून नव्हे, तर आम्ही प्रत्यक्ष त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्हाला माहीत आहे की हा मनुष्य खरोखर जगाचा तारणारा आहे.”


तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे.


रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.


तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?


परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.


असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,” त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो.


मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्‍या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.


जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.


तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.


म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.


माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.


कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत.


आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत,


परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.


कलस्सै शहरातील पवित्र लोक व ख्रिस्तामधील विश्वासू बंधू व भगिनीस, परमेश्वर आपले पिता यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो.


मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले.


ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,


माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास: परमेश्वर पिता आणि ख्रिस्त येशू आपले प्रभू, यांची कृपा, दया आणि शांती असो.


कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.


आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्‍या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.


आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी.


येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून, ज्यांना आपले परमेश्वर आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या नीतिमत्वाद्वारे आमच्यासारखाच मोलवान विश्वास मिळाला आहे त्यास:


तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात तुमचे भव्य स्वागत होईल.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.


परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.


माझी इच्छा आहे की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि आमचे प्रभू आणि तारणाऱ्याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी.


आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.


प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan