Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 4:11
24 Iomraidhean Croise  

एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,


एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”


लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.


पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”


लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”


लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.


राहेलचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन हे होते.


मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली.


सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता.


याबद्दल आम्ही एफ्राथाहमध्ये ऐकले, नंतर तो याआर प्रदेशात सापडला:


सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.


तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.


साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.


“परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”


“ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”


परंतु याबाबतीत मृत माणसाच्या भावाने त्याच्या मृत भावाच्या विधवेशी विवाह करण्यास नकार दिला, तर तिने त्या नगराच्या वेशीवर वडीलजनांकडे जाऊन त्यांना म्हणावे, “माझ्या पतीचा भाऊ आपल्या भावाचे नाव इस्राएलात पुढे चालविण्यास तयार नाही. माझ्याप्रति तो आपले दिराचे कर्तव्य पार पाडणार नाही.”


तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”


त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब या देशात गेले आणि तिथे राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan