Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आंघोळ कर, सुगंधी अत्तर लाव आणि तुझी उत्तम वस्त्रे घाल. नंतर खाली खळ्यात जा, परंतु त्याचे खाणे आणि पिणे होईपर्यंत त्याला माहीत होऊ देऊ नकोस की, तू तिथे आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर तू नाहणमाखण कर. चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तर तू शुद्ध हो, सुगंधीत तेल लाव आणि वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत तू त्याच्या नजरेला पडू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 3:3
10 Iomraidhean Croise  

तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.


तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.


मग तिसऱ्या दिवशी एस्तेरने तिची शाही वस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतील अंगणात, राजदरबाराच्या अगदी समोर, जाऊन उभी राहिली. राजा राजदरबारात आपल्या राजासनावर, प्रवेशद्वाराच्या सन्मुख बसला होता.


मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात.


तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा.


“ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले.


तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा,


ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.


जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan