Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 2:13
15 Iomraidhean Croise  

निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.”


“नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते.


मग एसाव म्हणाला, “माझी काही माणसे तुमच्याबरोबर ठेवू द्या.” “पण हे का करावे?” याकोब म्हणाला, “माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे.”


एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.”


याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला.


त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्‍या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”


तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.” सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.”


याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.


“त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही, याहवेह असे घोषित करतात.


स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे.


तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले.


तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”


भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.


ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.


तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan