Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहचल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले; तेथील बायका म्हणू लागल्या, “ही नामीच काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:19
6 Iomraidhean Croise  

येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”


वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?”


ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?


नाओमीने त्यांना म्हटले, “मला नाओमी म्हणू नका, मला मारा असे म्हणा, कारण सर्वसमर्थांनी माझे जीवन फार कडवट केले आहे


त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे.


सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan