Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 3:3
19 Iomraidhean Croise  

सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.


त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.


परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.


त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.


परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”


कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात.


तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही.


आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.


जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.


कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत.


जे परमेश्वर इस्राएलचे वैभव आहेत, ते असत्य बोलत नाहीत किंवा आपले मन बदलत नाही; कारण आपले मन बदलण्यास ते मानव नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan