Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 3:2
29 Iomraidhean Croise  

तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत.


परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही.


परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही.


तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;


तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.


ज्या शुभवार्तेविषयी पवित्रशास्त्रलेखात त्यांनी आपल्या संदेष्ट्यांद्वारे आधी अभिवचन दिले होते.


तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता;


तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का?


जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का?


हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत.


मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.


परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे.


याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते.


हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.


वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!


जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!


तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”


नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan