Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्‍यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 2:3
22 Iomraidhean Croise  

तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”


“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’


तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.


त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका.


याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.


याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.


परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?


त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही.


“भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!” जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.”


“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?


मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय?


परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?”


थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला.


हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.


अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.


जे तुम्ही दुसर्‍यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्‍यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.


आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे.


मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”


“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.


तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्‍याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्‍याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू?


ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?


Lean sinn:

Sanasan


Sanasan