Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पण अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 2:2
27 Iomraidhean Croise  

ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”


लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही, जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.


याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.


कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात.


सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.


ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.


मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.


पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.


हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?


“तरीही तुम्ही म्हणता: ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकांनो ऐका: माझा मार्ग अन्यायी आहे काय? जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?


तरीही इस्राएल लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकहो, जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?


आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.


परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; ते काहीही अयोग्य करीत नाहीत. प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.


कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”


जे तुम्ही दुसर्‍यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्‍यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.


तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?


तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.


तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही.


मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.


कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan