Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रोमकरांस 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




रोमकरांस 1:8
25 Iomraidhean Croise  

सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.


त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.


त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.)


परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.”


परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले: “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.”


तुमच्या आज्ञापालनाबद्दल प्रत्येकाने ऐकले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो; तरी तुम्ही जे उत्तम त्यासंबंधाने सुज्ञ आणि जे वाईट त्याविषयी अज्ञानी असावे, अशी माझी इच्छा आहे.


परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.


ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.


परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.


या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून


माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही.


त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यान् पिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.


आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.


येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.


जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.


आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो त्यावेळी परमेश्वराचे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे सतत आभार मानतो,


आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो.


परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.


मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.


मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो,


तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.


तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!


Lean sinn:

Sanasan


Sanasan