Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 (त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 8:11
17 Iomraidhean Croise  

मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.)


परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.


म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात: “मी त्यांना खावयास कडू दवणा देईन व प्यावयास विषारी पाणी देईन, कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.”


म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.


माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.


विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.


असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात आणि नीतिमत्ता धुळीस मिळवितात.


घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;


याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील, परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील.


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्‍या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या.


परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.


त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.


पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.


आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.


आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली.


नाओमीने त्यांना म्हटले, “मला नाओमी म्हणू नका, मला मारा असे म्हणा, कारण सर्वसमर्थांनी माझे जीवन फार कडवट केले आहे


Lean sinn:

Sanasan


Sanasan