Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:9
41 Iomraidhean Croise  

मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.


माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.


सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील.


तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात, प्राण्यांनी समृद्ध असलेल्या पर्वतांपेक्षा अधिक वैभवी.


माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.


इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.


याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.


त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत.


त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.


नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो.


नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले: “तुमची भरपूर उन्नती होवो!


“तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील


पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.


मी त्यांना संकेत देईन, आणि त्यांना एकत्र करेन. मी निश्चितच त्यांना सोडवेन; ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील.


“त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.


त्या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक एकत्र झाले त्यामुळे ते एकमेकास चेंगरू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना म्हणाले, “या परूशी लोकांच्या खमिरापासून म्हणजे ढोंगीपणापासून सांभाळा.


पुढे घडणार्‍या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”


त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”


प्रिय बंधूंनो व भगिनींनो, या रहस्याविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की तुम्ही बढाई मारू नये: गैरयहूदी लोकांची ठरलेली संख्या पूर्ण विश्वासात येईपर्यंत इस्राएली लोक काही प्रमाणात कठोर झाले आहेत,


यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.


आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला.


परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात.


कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”


तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.


म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.


राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.


तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते.


ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,


तेव्हा त्यातील प्रत्येकाला एकएक पांढरा झगा देण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांचे सहकर्मी बंधू, हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, आणखी थोडा काळ थांबा.


जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.


Lean sinn:

Sanasan


Sanasan