Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्‍ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता दुसरा बैलासारखा होता तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता, आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 4:7
20 Iomraidhean Croise  

यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?


शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.


जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो.


पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.


त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.


त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते.


प्रत्येक करुबाला चार तोंडे होती: एक करुबाचे होते, दुसरे मनुष्याच्या तोंडासारखे, तिसरे सिंहासारखे व चौथे गरुडासारखे होते.


प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते आणि त्यांच्या पंखाखाली मानवी हातांसारखे काहीतरी होते.


“पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.


तू गरुडांप्रमाणे उंच भरार्‍या मारीत असलास किंवा आपले घरटे तार्‍यांमध्ये बांधत असलास, तरी तिथून मी तुला खाली आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.


लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; ते सिंहासारखे उभे राहतात जे त्याची शिकार खाईपर्यंत व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”


सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”


प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा.


याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,


त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते. राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते.


नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली.


मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते.


जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan