Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुम्हाला राखीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 3:10
30 Iomraidhean Croise  

पृथ्वीवरील सर्व लोकांनो, तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे!


पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.


तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”


आणि आम्हास परीक्षेत आणू नका, परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन’


मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”


त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.


“तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे.


प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.


मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.


यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.


जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील.


माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्‍या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.


प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे.


नीतिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो.


उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.


“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.


कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.


पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.


कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्‍या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.”


नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता.


चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात.


पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”


तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार.


तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.


तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.


त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”


मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan