Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात: तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस!

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 3:1
30 Iomraidhean Croise  

कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.


हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”


त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.


मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरतांना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’


आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.


ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात.


आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात.


तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.


आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.


जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.


परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.


जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.


त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.


हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.


तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”


त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.


तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो


तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.


तुमची सर्व कृत्ये मला ठाऊक आहेत आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची होत असलेली प्रगती देखील मला दिसते.


तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्‍यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.


मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.


तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते!


जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.


तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.


राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते.


मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan