Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:4
26 Iomraidhean Croise  

कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्‍या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.


सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.


यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.


आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.


ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.


तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही, आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही. कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील; आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.


त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.


“मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन; मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन. अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे? हे कबरे, तुझा नाश कुठे आहे? “मला काहीही कळवळा येणार नाही,


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.


शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल.


जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे.


जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.


यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”


“पुनः एकदा” चा अर्थ असाच दिसतो की अस्थिर—निर्माण केलेल्या—वस्तू ते काढून टाकतील व नाश होणार नाही अशाच अढळ गोष्टी टिकतील.


परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.


जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.


जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.


मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय.


नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश” पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते.


तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.


कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’”


Lean sinn:

Sanasan


Sanasan