Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:3
29 Iomraidhean Croise  

“पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?


“पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?


“मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.


मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.


सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”


“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.


मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.


माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.


परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.


“चोहीकडील अंतर अठरा हजार हात असणार. “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’ असे असणार.”


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.”


आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.


शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.


येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.


आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”


आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”


आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा.


पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे.


परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.


प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत.


त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द मोहरबंद कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.”


मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.”


तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्‍याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!


जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.


तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.


म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan