प्रकटी 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला, त्याने घोषणा केली, “हालेलूया! कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राजाधिकार हाती घेतला आहे.” Faic an caibideil |
तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!