Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 19:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 19:3
9 Iomraidhean Croise  

त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले.


सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत; दुष्ट परत न दिसोत. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. याहवेहचे स्तवन कर!


रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. त्याचा धूर कायमचा उठत राहील. पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.


त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.


त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली.


धुराच्या उसळणार्‍या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’


“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,


यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!


तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan