Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ज्या परिमाणाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या परिमाणाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही. मी दुःख पाहणारच नाही!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:7
16 Iomraidhean Croise  

राजाने हामानाला फर्माविले, “आता त्वरा कर आणि माझा पोशाख आणि माझा घोडा घे आणि तू सांगितलेस अगदी त्याप्रमाणे राजद्वारी बसणारा यहूदी मर्दखयाच्या बाबतीत कर. तू सुचवलेल्या कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नको.”


तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो.


राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत.


राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”


एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, आता कशी निर्जन झाली आहे! एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी आता कशी दासी झाली आहे.


तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’


ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.


परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,


तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”


“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan