Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या; तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 जसे तिने दिले, तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याल्यात जितके ओतले, त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:6
21 Iomraidhean Croise  

अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.


जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.


यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.


लज्जेच्या ऐवजी तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल, आणि अप्रतिष्ठे ऐवजी तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल. आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल, आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल.


त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”


माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.


तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.


“धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,


“बाबिलोन व बाबिलोनचे लोक यांनी सीयोनाशी जे दुष्कृत्य केले, त्याबद्दल मी तुझ्या डोळ्यादेखत त्यांची परतफेड करेन.” असे याहवेह जाहीर करतात.


“जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे बाबेलचा पाडाव होईल.


हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.


अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या; आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.


आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील,


“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.


त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.


त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला.


पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”


त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.


“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan