Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अमर्याद विषयभोगाने धनवान झाले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:3
17 Iomraidhean Croise  

ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.


“बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे.


बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.


उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.


या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.


जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात.


परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,


तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”


पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”


मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! ज्या सर्वांकडे जहाजे होती ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’


दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.


तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”


“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan