प्रकटी 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
12 “त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल.
मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्याच्या डोक्यावर असलेली दहा शिंगे आणि दुसरे शिंग जे बाहेर आले, त्यापैकी तीन शिंगे बाहेर आल्यावर पडली. मला त्या दहा शिंगांविषयी आणि जे शिंग नंतर आले, ज्याच्या येण्याने तेथील तीन शिंगे तुटून पडली—ते शिंग जे इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसले आणि ज्याला डोळे होते व फुशारकी मारणारे बढाईखोर तोंड होते, मला हे जाणून घ्यायचे होते.
तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.
तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्हाड कोसळली आहे!’
मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! ज्या सर्वांकडे जहाजे होती ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’