Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:6
25 Iomraidhean Croise  

त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.


डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,


याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल.


तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”


“मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.


मग याजक व संदेष्टे, अधिकारी व लोकांस म्हणाले, “या मनुष्यास मरणदंड दिलाच पाहिजे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला आहे, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे!”


यावर अधिकारी व लोक, याजकांना आणि संदेष्ट्यांना उद्देशून म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडाला पात्र नाही, कारण तो आमचे परमेश्वर याहवेहच्या नावाने आमच्याशी बोलला आहे.”


तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.


तुझ्या वाहत्या रक्ताने अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील.


कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.


परंतु ज्यांना माहीत नाही की त्यांनी शिक्षेस पात्र अशी कृत्ये केली आहेत त्यांना थोडेच फटके मारण्यात येतील. ज्या प्रत्येकाला भरपूर दिलेले आहे, त्याच्याकडून भरपूर मागणी केली जाईल आणि ज्याच्याकडे अधिक सोपविलेले आहे, त्याच्याकडून खूप अधिक मागण्यात येईल.


तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?


राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.


या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्‍या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”


“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”


पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.


कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan