Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “जो तू आहेस व होतास, तो तू पवित्र आहेस! तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस!

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:5
18 Iomraidhean Croise  

ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”


परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”


याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.


“याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.


म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत.


“हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे.


तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.


परंतु जर आमच्या अनीतीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहेत काय? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.)


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो


प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”


ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.


तिसर्‍या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्‍यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले.


नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.”


कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”


त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”


त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan