Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तिसर्‍या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्‍यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तिसर्‍याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:4
10 Iomraidhean Croise  

त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले; त्यामुळे त्यांच्या जलप्रवाहातील पाणी पिता आले नाही.


यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”


मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.


वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील.


जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.


त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे.


तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”


मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan