Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 15:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 15:3
49 Iomraidhean Croise  

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.


अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.


तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “याहवेहचा सेवक मोशे आणि इस्राएलच्या सभेचे लोक यांनी लावलेला करार नियमांच्या तंबूसाठी लावलेला कर यहूदीया आणि यरुशलेममधून आणण्याची मागणी तुम्ही लेवींकडे का केली नाही?”


तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र शब्बाथाची ओळख करून दिली व तुमचा सेवक मोशेद्वारे त्यांना आज्ञा, नियम व कायदे प्रदान केले.


ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.


आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.


कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.


परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.


याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.


त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.


मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो.


याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.


ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.


परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.


त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली.


हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!


राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.


कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.


पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.


जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”


सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.


फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.


परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; ते काहीही अयोग्य करीत नाहीत. प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.


सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!


कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे.


आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले.


मी याहवेहचे नाव जाहीर करेन. आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!


आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला.


जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.


जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”


परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”


प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”


ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.


लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.


तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”


ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”


त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.


कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”


त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan